Friday, April 30, 2010

सावंत वाडी




सावंत वाडी - ऐतिहासिक वारसा लाभलेल पर्यटन स्थल , जैविक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धि असलेलशहर। इथे आल्यावर अस वाटत की स्वर्ग यापेक्षा किती सुन्दर असू शकतो ?
सकाळी गावातून फेर फटका मारताना वाटत की आपण स्वप्न तर बघत नहीं ना?
हे आहे शिल्प ग्राम। हे सावंत वाडी शहराच सांस्कृतिक केंद्र आहे देशातुनच नाहीतर सर्व जग भरातुन इथे पर्यटकसांस्कृतिक कार्यक्रम , शिलपकारानी तयार केलेल्या वस्तू विविध प्रकारची खेळणी पाहण्या साठी येतात । इथे रोज संध्याकाळी बाहुल्यांचा कार्यक्रम तसेच परिसरातली लोकगीते सादर केली जातात

आत आल्यावर पर्यटकासाठी खास बम्बू मध्ये तयार केलेली बैठक व्यवस्था आहे।इथे बसून पर्यटक कार्यक्रमबरोबरच स्थानिक मेजवानिचा ही आनंद लुटतात। सोल कढी, तांदुल ची भाकर, खोबरयाच्या वड्या आणि अजुनखुप काही। जेवण वाढायलाही आजी बाई एकदम मराठ मोल नउ वारी लुगड घालून येतात।
सावंत वाडी पासून जवळ ही बरीच प्रेक्षणीय स्थले आहेत .
कुडाळ हे भारतातील एक महत्वाचे बाम्बू निर्मिती संशोधन केंद्र आहे.
तार कर्ली हे गर्दी नसलेल आणि स्वच्छ असा किनारा असलेल पर्यटन स्थल आहे। मालवण चा सिन्धु दुर्ग इथून जवळ आहे। आम्बोली हे जैव विविधते साठी प्रसिद्ध ठिकाणही याच भागात आहे।
आपल्याकडेही या ठिकाणविषयी माहिती असेल तर जरुर कळवा।
धन्यवाद !